जळगाव प्रतिनिधी । जळगावातील मेहरूण परिसरातील अक्सा नगर येथे माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेला माहेरहून १ लाख रुपये घर खर्चासाठी आणावे. यासाठी मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या ठाणे येथील पतीसह चार जणांवर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरूण परिसरातील अक्सा नगर येथे आई वडीलांकडे राहणारी २४ वर्षीय विवाहितेचा ठाणे येथील मुजाहीद शेख जाहीद यांच्याशी लग्न झाले. सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. पती मुजाहीद शेख हे काम करत नसल्याने घरात पैसे येणे बंद झाले. दरम्यान घर खर्च करण्यासाठी विवाहिला तिचा पती मुजाहीत मारहाण करून माहेरहून १ लाख रूपये घेवून ये असे सांगितले. आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर सासरे शेख जाहीद कबीर, सासु नसरी बानो शेख जाहीद, दिर शोऐब शेख जाहीद सर्व रा.अलमास कॉलन कौसा, मुब्रा ठाणे यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला.
माहेरहून पैसे आणले नाही तर तुला तलाक देवू अशी धमकी दिली. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता ही १२ डिसेंबर रोजी आईवडीलांकडे आली. आपल्यावर होणार छळ आईवडीलांना सांगितल्यानंतर तिला धिर दिला. शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.