जळगाव – पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाऊंना भावांजली महोत्सवास वेणू वादनाने करण्यात आला.
१६ ते २० डिसेंबर दरम्यान होणार्या महोत्सवाची सुरुवात वेणुत्सवाने झाली. केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी परिवर्तनच्या उपक्रमाचे कौतुक करत चार वर्षांपासून सुरू असलेल्या भावांजली महोत्सवाचा गौरव केला. साहित्य, संगीत, नाट्य कला व कलाकार वाढीत परिवर्तचा पुढाकार महत्त्वाचा असलयाचे त्यांनी सांगितले.
आनंद मलारा यांनी भाऊ कलाकारांना जपत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया यांनी केले. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील, श्रीराम खटोड, नंदू अडवाणी, नाट्यकर्मी संदीप घोरपडे, राहुल निंबाळकर, अमर कुकरेजा, मंगेश कुलकर्णी, होरीलसिंग राजपूत, भाऊसाहेब पाटील, विनोद पाटील, नंदलाल गादीया, अनिस शहा, किरण बच्छाव, शंभू पाटील, नारायण बाविस्कर, राहुल निंबाळकर उपस्थित होते.
वेणुत्सवात संजय सोनवणे व २० बासरी कलावंतांनी आपल्या वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सुरुवात देश रागाने करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता भैरवी रागाने झाली. संजय सोनवणेंनी भाऊंच्या उद्यानात आपल्या २० बासरी वादकांसह एक अनोखे वातावरण तयार केले होते.
यात त्यांना तबल्यावर प्रा. सागर थोरात, गिटार रितेश धनराळे, ऑक्टोपॅड प्रबुद्ध भालेराव यांच्यासह २० बासरीवादक कलाकारांत गणेश पवार, कुलपात पाटील, दिनेश बिर्हाडे, हर्षल सोनवणे, गणेश पाटील, वैजनाथ, पीयूष बिर्हाडे, अजय सोनवणे या कलावंतांनी सहकार्य केले. शास्त्रीय व उपशास्त्रीय सादरीकरणाबरोबर बासरीच्या सुरांतून गाणी ऐकताना उपस्थित रसिक तल्लीन झाले होते. कार्यक्रमाचे निवेदन मंजूषा भिडे यांनी तर सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले.
तसेच पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सुरू असलेला भाऊंना भावांजली परिवर्तन कला महोत्सवात १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता भाऊंच्या अँफी थिएटरमध्ये दि. बा. मोकाशी यांची ङ्गपालखीफ सादर होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना हर्षल पाटील यांची तर शंभू पाटील यांचे नाट्यरूपांतर आहे.