यावल ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संपुर्ण राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
विविध समाजहिताच्या आणी जनहिताच्या योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर करून राज्यातील नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले असता यास प्रतिसाद देत राज्यातुन युवकांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची जी कमतरता सध्याच्या घडीला आहे, ती भरून काढण्यासाठी यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे खरेदी विक्री संघाच्या सभागृहात येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात २ ५ ते ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास प्रमूख पाहुणे म्हणून माजी आमदार मनीष जैन , राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी दादा पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यकंट चौधरी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले , यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष व नगर परिषदचे गटनेते अतुल वसंत पाटील , आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम बी तडवी सर , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय प्रेमचंद पाटील , राष्ट्रवादीचे यावल शहराध्यक्ष करीम मन्यार काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान , अनिल जंजाळे , राष्ट्रवादी चे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , गनी भाई ,दीपक पाटील प्रशांत पाटील विनोद पाटील गुणवंत निळ ,राजू करांडे , सईद शेख, आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
या रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष देवकांत पाटिल , राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष हितेश गजरे समन्वयक किशोर माळी तालुका उपाध्यक्ष पवन पाटील कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे उपाध्यक्ष वीरेंद्र सिंह पाटील पवन धोबी सचिव भूषण खैरे आशुतोष पाटील सोनू कोळी आदिवासी युवक सेलचे पंकज तडवी अमित तडवी रमजान तडवी अमिन तडवी अल्पसंख्यांकाचे नदीम रजा खाटीक आदींनी महत्वाचे परिश्रम घेतले .