यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्राम पंचायतच्या माध्यमातुन झालेल्या विविध निकृष्ठ कामांची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी या आदेशाला यावलच्या गटविकास अधिकारी कार्यालयात कैराची टोपली मिळाल्याने या निकृष्ट कामाची अद्याप चौकशीच झालेली नसल्याची तक्रार डोंगर कठोरा येथील सामाजीक कार्यकर्ते पद्दमाकर कडु कोळी यांनी केली आहे .
या संदर्भात पद्दमाकर कोळी यांनी सांगीतले आहे की आपण मागील २ / ०३ /२०२०या कालावधीत जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे डोंगर कठोरा येथे १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गावात विविध विकासाची कामे करण्यात आली असुन ही लाखो रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या कामांना शासकीय अटी शर्तीचे व निविदा प्रमाणे साहीत्य वापरण्यात न आल्याने या कामांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न निर्माण झाल्याने शासकीय निधीचा योग्य प्रकारे वापर व्हावा
या सामाजहिताच्या दृष्टीकोणातुन प्रथम गटविकास अधिकारी यावल व नंतर लोकशाही दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लिखित तक्रार केली असता जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत दिनांक ९ / ०३ /२oरोजी डोंगरकठोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातुन १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन करण्यात आलेल्या विविध विकास कामांची चौकशी करून तसा कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास पाठवावा असे आदेश असतांना ही यावलचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या या लिखित आदेशाला कैराची टोपली दाखल्याने सदरच्या या लाखो रुपयांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या निकृष्ठ कामांची चौकशी अद्याप पर्यंत हो शकली नाही पंचायत समितीच्या या हेतुपुरस्पर दुर्लक्षित कारभारामुळे भ्रष्ठ कारभाऱ्यांना चांगलेच पावत असल्याची संत्पत प्रतिक्रीया डोंगर कठोरा येथील सामाजीक कायर्यकर्ते पद्माकर कडु कोळी यांनी व्यक्त केली आहे .