मेष : आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक दृष्टय़ा उत्कर्षाच्यादृष्टीने अतिशय शुभ आहे. आपल्या योग्य निर्णयामुळेव्यवसायातील महत्वाची कामे मार्गी लागतील. व्यावसायिक करारमदार होतील. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल.
वृषभ : नोकरीत कामाची दगदग जाणवेल. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. कौटुंबिक कलह टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मन सैरभैर होईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीतून सुखसमाधान लाभेल .
मिथुन : आज आपण आपल्या हौसेसाठी खर्च कराल. आपण गोड बोलून कुटुंबातील व्यक्तिंकडून आपल्या कामासाठी त्यांचेसहकार्य घ्याल. आज आपल्याला महत्वाची कामे पुढे ढकलावी लागतील. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तिंच्या भेटी होतील.
कर्क : आज आपण पूर्वनियोजित प्रवासात जाणार असाल तर काही कौटुंबिक कारणाने आपल्याला प्रवासाने रद्द करावी लागेलविद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्षासाठी आजचा दिवस अनुकूल आहे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील.
सिंह : तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. विरोधकांवर मात कराल, आपली मते त्यांनायोग्य मार्गाने पटवून द्याल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.
कन्या : आज आपल्याला संततीच्या उत्कर्षाची बातमी कानी येईल. छोटे प्रवासयोग घडतील. प्रवासातून आपले ध्येय साध्यकराल व एखाद्या नवीन कार्याचा शुभारंभ कराल. आशावादी धोरण स्वीकारणे फायदेशीर राहील. स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च कराल.
तूळ : आज आपल्याला वाहन खरेदीचा योग आहे. शुभसमारंभात आज आपण सहभागी व्हाल. सुग्रास भोजनाचा योग आहे. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.
वृश्चिक : संतसज्जनांचा सहवास लाभेल. घरगुती समारंभात सहभागी व्हाल. आर्थिक उन्नतीस आजचा दिवस अनुकूल आहे. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. कामात अडथळे येण्याती शक्यता आहे.
धनू : आजचा दिवस गुंतवणूकीसाठी अनुकूल नाही. आज आपल्या हातून धार्मिक कृत्ये घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल. त्यामुळे मनातील गोंधळही कमी होईल. कामाचा ताण जाणवणार नाही.
मकर : आज आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल. सामाजिक कार्य करणार्यांना समाजात प्रतिष्ठा लाभेल. महत्वाचेपत्रव्यवहार होतील. मनोबल वाढेल. वेगाने कार्यरत राहाल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल.
कुंभ : आपल्या इच्छा पूर्ण होण्यास व आपली कामे मार्गी लागण्यासाठी सकाळचा वेळ अतिशय उत्तम आहे. संध्याकाळीआपल्याला काही कारणानिमित्त घराबाहेर पडावे लागेल. मित्ररिवारांचे सहकार्य लाभेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
मीन : मित्रपरिवारांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल. आज आपले निर्णय योग्य ठरतील. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.