जळगाव – १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्यास नमवून बांगलादेशच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावणाऱ्या वीर भारतीय जवानांच्या या यशास आज ४९ वर्षे पूर्ण झालेत. हा विजय दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी १८ महाराष्ट्र बटालीयनचे समादेशक कर्नल प्रविण धीमान यांच्या नेतृत्वात, १९७१ च्या आठवणी म्हणून बटालीयनच्या ७१ छात्र सैनिकानी ७१ किलोमीटर सायकलिंग करून युवकांमध्ये सशक्त भारताचा मंत्र जोपासला.
विशेष म्हणजे कर्नल धिमान यांच्या आवाहनावरून जिल्ह्याचे नियोजन अधिकारी श्री प्रतापराव पाटील आणि त्यांचे सायकल पटू मित्रपरिवार देखील खुल्या मनाने सहभागी होऊन राष्ट्र भक्तीत प्रखर केली.
१८ महाराष्ट्र बटालीयनचे सुभेदार मेजर कोमल सिंग, सुभेदार जय पॉल, हवालदार विजेंदर आणि आदी सहकाऱ्यांनी या मोहिमेचे सारे नियोजन केले. रस्त्यात ठिकठीकाणी पाणी, ज्यूस, केळी याचे सुयोग्य नियोजन केले होते. तसेच डॉ. कांचन कुलकर्णी यांनी या मोहिमेत दक्षता म्हणू सामील होत्या. परंतु साऱ्या सहभागी सायकल पटूनी उत्तम रित्या ही मोहीम जळगाव ते पद्मालय पर्यंत पार पडली. कॅप्टन कमल पाटील, लेफ्ट. जी.डी. भालेराव, लेफ्ट डॉ. योगेश बोरसे, लेफ्ट शिवराज पाटील, सी.टी.ओ. ज्योती मोरे, यांचे विशेष योगदान लाभले.