जळगाव प्रतिनिधी । शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. याच भूमीवर पार्श्वभूमीवर ऑनलाईन माध्यमातून एटीएम क्लोनच्या करून ४१२ कोटी रूपयांचा अपहार करणाऱ्या टोळीचा डाव रामानंद नगर पोलीसांनी गुरूवारी उद्ध्वस्त केला होता. यात काल रात्री उशीरापर्यंत तीन जणांना अटक केली होती. आज पुन्हा दोन आरोपी नाशिक तर एक आरोपीस कल्याण येथून अटक केली आहे. आता एकुण सहा संशयित आरोपी झाले आहे.
हॅकरच्या सहाय्याने ४१२ कोटींवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा रामानंदनगर पोलिसांनी इथिकल हॅकर मनीष भंगाळेच्या सहाय्याने पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी जळगावातील एका पत्रकारासह धुळ्यातील बिल्डरला अटक केली आहे. हेमंत ईश्वरलाल पाटील, वय-४२ (रा.भुरे मामलेदार प्लॉट शिवाजीनगर जळगाव) असे त्या पत्रकाराचे तर मोहसीन खान इस्माईल खान, (वय-३५, रा. देवपूर धुळे ) असे पोलिसांनी अटक केलेल्या बिल्डरला अटक केली होती. दोघांना न्यायालयात हजर केले असता २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आले.
अजून चार संशयित अटकेत
हेमंत पाटील आणि मोहसीन खान यांना पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक नाशिक, कल्याण आणि गुजराथ रवाना झाले होते. शुक्रवारी रात्री उशीरात संशयित आरोपी जयेश मनिलाल पटेल (वय-४५) रा. चिखली, जि. नवसारी, गुजरात याला राहत्या घरातून अटक केली. तो मासेविक्री करण्याचे काम करतो. तर नाशिक येथून दिपक चंद्रसिंग राजपूत (वय-४६) रा. पंचवटी नाशिक, भरत अशोक खेडकर (वय-४७) रा. जेलरोड आणि कल्याण येथून रविंद्र मनोज भडांगे (वय-४६) रा. जेलरोड नाशिक याला अटक केली आहे.
यातील रविंद्र मनोज भडांगे हा नाशिक येथील युनियन बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीला होता. मात्र अपहार प्रकरणात त्याला बँकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या तिघांच्या माध्यमातून आजून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तिघांची रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू राहणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस कॉन्स्टेबल रवि चौधरी, रवि पाटील, उमेश पवार, शिवाजी धुमाळे यांनी कारवाई केली.
अजून वाचा
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात