यावल – तालुक्यातील गिरडगावाजवळ चोपडा यावल मार्गावर दोन मोटरसायकल वाहनामध्ये झालेल्या भिषण अपघातात एका महीलेसह पाच जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाली आहे .
आज दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोपडा यावल मार्गावर मोटरसायकल क्रमांक एम .पी. ६८ .एमजी२१ ३८व मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ .८१०८ यांच्यात समोरासमोर धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात सचिन रमेश पावरा वय२० वर्ष राहणार वाघझीरा तातुका यावल ,ज्योती तुफान बारेला वय१७ वर्ष राहणार चांगल्या तलाव तालुका चोपडा , श्रीराम बारेला वय ४० वर्ष तुकडयाकुमार वय २५ वर्ष आणी ओमप्रकाश कैलास पटेल वय ४२ राहणार तुकईथड जिल्हा खंडवा मध्यप्रदेश यांचा समावेश असुन घटनेची माहीती याच मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांनी तात्काळ यावल ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात माहीती कळविल्याने त्वरीत १०८ क्रमांकाच्या वाहनाने जख्मींना रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकाय अधिकारी डॉ .बी.बी.बारेला यांनी व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी प्रथम उपचार करून यातील सचिन बारेला व ओमप्रकाश पटेल यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविले आहे .