Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सर्व पी. एचडीच्या पदवी रद्द करण्यात याव्यात – अँड. कुणाल पवार

by Divya Jalgaon Team
December 14, 2020
in जळगाव
0
सर्व पी. एचडीच्या पदवी रद्द करण्यात याव्यात - अँड. कुणाल पवार

जळगाव – कवयित्री सर्व पी. एचडीच्या पदवी रद्द करण्यात याव्यात - अँड. कुणाल पवार

गेल्या चार पाच वर्षांपासुन जळगाव विद्यापीठामध्ये काही विशेष लोकांसाठी व त्यांच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासन काम करित असल्याची अनेक उदाहरण याआधी उघड झालेली आहेतच.

डॉ.अविनाश बडगुजर यांनी त्यातच कला शाखेच्या प्रथम वर्षासाठी लिहलेली ईंग्रजीचे पुस्तक “रीडिंग लिट्रेचर”  ह्या पुस्तकात कॉपी पेस्ट करून प्रकाशित केल्याचे समोर आले आहेत. अशी तक्रार राष्ट्रवादीचे सचिव अँड कुणाल पवार यांनी कुलगुरूंना केली आहे.

विद्यापीठामध्ये ईंग्रजी अभ्यास मंडळासह अनेक समितींवर कार्यरत असलेले डॉ.अविनाश बडगुजर, नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी कला शाखेच्या प्रथम वर्षाचे ईंग्रजीचे पुस्तक “Reading Literature” हे संकलीत व प्रकाशीत केले.

मात्र हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी उघडपणे व बिनबोभाटपणे वाङमयचौर्य केल्याचे स्पष्ट होत आहे.

यासंबंधी अधिक माहिती घेतली असता असे समजते कि, डॉ. अविनाश बडगुजर यांनी “Literary Forms, Trends and Movements (Rama Brothers) या पुस्तकातुन पान क्र. 28 ते 41 ही पाने जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहेत. तसेच इतरही अनेक पुस्तकातील पाने इंटरनेटवरुन उचललेली दिसून आलेली आहेत.

त्यामुळे कुलगुरुंकडे या सर्व प्रकरणाची तक्रार केली गेली असुन त्यासंदर्भात एक तज्ञ चौकशी समितीसुध्दा गठीत झाल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे परंतु विद्यापीठाच्या सद्याच्या कार्यपध्दतीनुसार फक्त समिती नेमली जाते व गेल्या आठ महिन्यांपासुन कोवीडचे कारण पुढे करुन या समितीचे प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवातच होत नसल्याचे समोर येत आहे.

डॉ.अविनाश बडगुजर हे स्वतः पीएच.डी.धारक असुन ते इंग्रजी विषयामध्ये पीएच.डी.चे मार्गदर्शकसुध्दा आहेत. मात्र विद्यापीठाचेच सर्वोच्च पदवीचे मार्गदर्शकच जर वाङमयचौर्य करित असतील तर त्यांचे स्वतःचे संशोधन व त्यांचे मार्गदर्शनाखाली होणारे इंग्रजी भाषा व साहित्याचे संशोधन यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.

अशा शिक्षकांचा व मार्गदर्शकांचा त्यांचे विद्यार्थी काय धडा घेणार व संशोधनाचा काय दर्जा राखल्या जाणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.

परंतु वाङमयचौर्यासारख्या गंभीर बाबीची चौकशी ही संबधीत दोन पुस्तकांचा अभ्यास करुन आॉनलाईन पध्दतीनेसुध्दा अहवाल सादर केल्या जाऊ शकतो व पुढील कार्यवाही विद्यापीठाला करता येते.

विद्यापीठाच्या इतर अनेक घोटाळ्यांसारखा पर्दाफाश होईल का नाही याबाबत सर्वंनाच शंका वाटत आहे. तसेच अश्या प्रकारचे गंभीर आरोप असणाऱ्या मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सर्व ph D च्या पदवी रद्द करण्यात याव्यात अशा खुलासा कुलगुरू यानी करावा असे आव्हान राष्ट्रवादीचे सचिव अँड कुणाल पवार यानी केले आहे.

Share post
Tags: #Divya JalgoanAd. Kunal PawarJalgaonMarathi NewsNCPUniversityसर्व पी. एचडीच्या पदवी रद्द करण्यात याव्यात - अँड. कुणाल पवार
Previous Post

अजय कॉलनी परिसरात रिक्षाची बॅटरी लंपास; गुन्हा दाखल

Next Post

वॉटर मीटरचा तिढा पालकमंत्र्यांनी सोडवावा – डॉ. चौधरी

Next Post
वॉटर मीटरचा तिढा पालकमंत्र्यांनी सोडवावा - डॉ. चौधरी

वॉटर मीटरचा तिढा पालकमंत्र्यांनी सोडवावा - डॉ. चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group