यावल प्रतिनिधी । केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलना विषयी अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज यावल येथे आंदोलन करण्यात आले .
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्र शासनाने बहुमताच्या जोरावर देशातील अन्नदाता शेतकरी बांधवांना देशोधडीला लावणारे तिन कायदे मंजुर केले असुन हे कायदे देशातील बडे उद्योगपतींच्या आर्थिक हिता व शेतकऱ्यांना संपवणारे असुन , केन्द्र शासनाने तात्काळ कायदे रद्द करावे या करीता देशातील शेतकरी बांधवांचे मागील १६ दिवसांपासुन आंदोलन सुरू असुन या आंदोलतास शिवसेने आपला पाठींबा दिला असुन ,दरम्यान केन्द्र शासनाने पेट्रॉल व डिझेल पुनश्च दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज यावल येथील भुसावळ टी पॉईट चौकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व शिवसेने उपजिल्हा प्रमुख तुषार (उर्फ मुन्ना ) पाटील यावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे केन्द्रीय राज्य रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्या बद्दल दानवे रावसाहेब यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले व पेट्रोल डिझेल संदर्भात रास्ता रोको करण्यात आला.
या रस्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे , यावलचे नगरसेवक दीपक शहर प्रमुख जगदीश कवडीवाले माजी तालुका प्रमुख कडू पाटील तालुका संघटक गोपाल चौधरी , संतोष खर्चे , पप्पू जोशी, शरद कोळी , जितु फालक , आदीवासी सेनेचे तालुका अध्यक्ष हुसैन तडवी , सागर देवांग , किरण बारी , कृउबा चे संचालक सुनील बारी, निलेश पारसकर , सुधाकर धनगर , राजेंद्रनाथ ,अमित पटेल , नितीन बारी , सचिन कोळी , स्वप्नील करांडे, दिनेश साळुंके , सागर बोरसे , योगेश राजपूत , योगेश पाटील ,चेतन राजपूत यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .