जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढीवर अर्थात ग.स सोसायटीवर आगामी निवडणुकीआधी प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी जिल्हा भाजप शिक्षक आघाडीने सहकार आयुक्तांकडे केली आहे. जिल्हा भाजप शिक्षक आघाडीने नाशिक येथील सहकार आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पुढील पंचवार्षिक निवडणूका होण्याआधी संस्थेवर तात्काळ प्रशासक नेमावा. विद्यमान संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली आहे, यात संचालक मंडळाने स्वत:चे नातेवाईक किंवा आपले हितसंबंधातील व्यक्तींची कर्मचारी म्हणून भरती केल्याचे म्हटले आहे. यासह संस्थेच्या सर्व शाखांमध्ये नवीन फर्निचर बनवून मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, संस्थेच्या संचालक मंडळाने नवीन ठेवी घेणे बंदच केल्या आहेत, आयकराचे विभागाचे पत्र पुढे करून जुन्या ठेवी परत करीत जेष्ठ नागरिकांचा तर काठीचा-आधार काढून घेतला आहे.
यासह सभासदांच्या मासिक वर्गणीत कपात केली, संचालक मंडळाचे निर्णय थांबवू प्रशासकांची नेमणूक करावी व पारदर्शी निवडणूक पार पाडावी अशी मागणी आघाडी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण जाधव,संजय वानखेडे, दुष्यंत पाटील, आनंद पाटील, पांडुरंग पाटील, संदीप घुगे, विजय गिरणारे, सतिष भावसार, किरण पाटील, एन.आर.दाणी आदींसह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.