यावल – तालुक्यातील हिंगोणा गावामध्ये आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत स्मशानभूमी संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन कार्यक्रम आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पार पडले .
हिंगोणा येथील हिंदु स्मशानभूमीच्या सरक्षण भिंतीचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थांनी केलेला पाठपुरावा व मागणीस तात्काळ प्रतिसाद देत रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांनी सुमारे चार लाख रुपयांचा निधी मंजुर करून प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली
यावेळी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , हरी धनंजय चौधरी, संजय चौधरी, जावेद जनाब,, काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष ईख्लास भाई , हिंगोणा ग्रामपंचायतचे माजी सरपंच महेश राणे ,ग्रा पं सदस्य, भूषण भोळे ग्रा . पं .सदस्य, अरमान तडवी, बाळू फालक, छगन गाजरे, गोपाळ गाजरे, धिरज गाजरे, भूषण राणे, सोनू भारंबे, मुकेश राणे, भूषण नेहेते ग्रामविकास अधिकारी देवानंद सोनवणे, पराग कुरकुरे, व अनेक गावकरी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.