Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धान्य व्यापाऱ्याची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक

शहर पोलीस स्थानकात अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
December 11, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगरातील धान्य व्यापाऱ्याला ‘फोन पे’ मधून मी कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याचे सांगत होता. व्यापाऱ्याच्या खात्यातून परस्पर २५ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञातावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धान्य व्यापारी अतुल नारायण बाविस्कर (वाणी) (वय-४७) रा. नारायण प्लाझा नवीपेठ, यांचे गोलाणी मार्केट येथे किरकोळ धान्याचे दुकान आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता (६२६३९६४४३७) या क्रमांकावरून अतुल बाविस्कर यांना फोन आला. आपण ‘फोन-पे’ कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने अतुल बाविस्कर यांच्या खात्यातून २४ हजार ९९६ रूपये परस्पर काढून घेतले. फोन ठेवल्यानंतर थोड्यावेळाने त्यांच्या मोबाईलवर पैसे कट झाल्याचे मॅसेज आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरूवारी दुपारी शहर पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहे.

Share post
Tags: crimeCrime newsDivya JalgaonFraudJalgaonMarathi Newsधान्य व्यापाऱ्याची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक
Previous Post

आहुजा नगर येथे अपघातात दोन जण गंभीर; गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात आज ५६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले; ५१ कोरोनामुक्त

Next Post
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जिल्ह्यात आज ५६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले; ५१ कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group