जळगाव – येथील विविध महाविद्यालयात जाऊन अभाविप च्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर ८ डिसेंबरपासून कोविड चे सर्व नियमावली चे पालन करून नववी ते बारावी चे वर्ग पूर्ववत सुरु करण्यात आले.
कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे संपूर्ण जग थाबलं होत.आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येताना दिसत आहे.अशा परिस्थितीत८ डिसेंबर पासून नववी ते बारावी चे महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले.
यावेळी आज अभाविप च्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरातील विविध महाविद्याल्यात जाऊन विद्याथ्यांचे स्वागत केले यावेळी चिराग तायडे,आकाश पाटील,मयूर माळी,नितेश चौधरी,मयूर अल्कारी,अजय माळी,देवेन्द्र पाटील,आदीकार्यकर्ते उपस्थित होते.