मुंबई – मालिकाजगतात दैवी चरित्रपटांना विशेष महत्त्व आहे. खंडोबा, गणपती, दत्तगुरू, शंकर, विठ्ठल अशा देवांच्या चरित्रपटानंतर आता कोल्हापूरस्थित ‘ज्योतिबा’ या देवावर आधारलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कौटुंबिक मालिकांप्रमाणेच पौराणिक मालिकांचाही आपला एक मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. व्हीएफएक्स तंत्राचा प्रभावी वापर आणि संशोधन-अभ्यासावर आधारित कथानक यातून साकारलेल्या पौराणिक कथा तरुणाईसह सगळ्यांनाच आकर्षित करत आहेत, असे मत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त के ले.
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत लाखो भाविक वाडीला जत्रेसाठी जमतात. शंकराचा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवाचे चरित्र उलगडणारी मालिका २३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोठारे प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबाच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ज्योतिबाचे चरित्र ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ‘अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासुर आणि कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला. या कथा आपण पुराणात वाचल्या आहेत. त्यांना मालिकेच्या निमित्ताने आकार देण्याचे काम आम्ही केले आहे’, असे महेश कोठारे यांनी सांगितले.
‘पौराणिक मालिका करताना खूप गाढा अभ्यास असावा लागतो. महेश कोठारे यांचा या अभ्यासात्मक मालिका निर्मितीत हातखंडा आहे आणि त्यांच्याबरोबर जी टीम आहे ज्योतिबा देवस्थानचे महेश जाधव, डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे या सगळ्या मार्गदर्शकांबरोबरच्या एकत्रित अभ्यासातून ही पौराणिक मालिका साकारते आहे’, असे राजवाडे यांनी स्पष्ट के ले. ज्योतिबाच्या भूमिके साठी अभिनेता विशाल निकम याने खूप मेहनत घेतली असून गेल्या काही दिवसांत त्याने त्यासाठी खास शरीर कमावले आहे. तर करवीरपूरनिवासिनी महालक्ष्मीच्या भूमिके तील अभिनेत्री निशा परुळेकर यांनी याआधीही आमच्याबरोबर काम के ले आहे. या मालिके वर आम्ही गेली पाच वर्षे काम करतो आहोत.