जळगाव – वाघनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अक्सिस बँकेच्या खात्यातून एका भामट्याने तब्बल ३४ हजार १२४ रुपये वेगवेगळे ट्रांजेक्शन करून काढून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
विशेष म्हणजे पैसे काढताना ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकावर बँकेकडून कुठलाही मेसेज येत नव्हता . यासंदर्भात सलीमखा जब्बारखा तडवी ( सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, रा. साई संस्कार कॉलनी , वाघ नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मागील २० वर्षांपासून त्यांचे अक्सिस बँकेत सॅलरी अकाऊंट आहे .
दिनांक २१ सप्टेंबर ते ६ डिसेंबरच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३४ हजार १२४ रुपये वेगवेगळे ट्रांजेक्शनच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्याचे लक्षात आले . याबाबत मोबाईलवर मात्र , कोणताही मेसेज बँकेकडून आलेला नव्हता.खात्यात पैसे कमी होत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी माहिती काढली असता अज्ञात व्यक्तीने ११ ऑक्टोबर रोजी गुरगाव रेल्वेचे ४१३ रुपयाचे रेल्वे तिकीट आयआरसीटीसीमार्फत वेगवेगळे ऑनलाईन ट्रांजेक्शन करून पैसे काढले आहेत . याबाबत अज्ञात भामट्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.