जळगाव प्रतिनिधी । जळगाव फर्स्ट या संघटनेचे संस्थापक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा लाऊन धरला आहे. या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनानंतर सद्यस्थितीत सुरू असणार्या कामाची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाहणी केली. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या सध्या सुरू असणार्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली.
महामार्गाच्या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कंत्राटदाराला असलेल्या अडचणी सोडवण्याबाबत त्यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. तसेच समांतर रस्त्यांच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सांगितले. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होईल. खोटेनगरपर्यंतचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. तेथून पाळधीपर्यंतचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होणार आहे.
डिसेंबर २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. तरसोद ते पाळधी बायपासचे काम लवकरच सुरू होणार आहे. तेथून पाळधीपर्यंतचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होणार आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. तरसोद ते पाळधी बायपासचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सुध्दा जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे.