मेष : आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपण महत्वाचे निर्णय घेणे टाळावे. आज पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.
वृषभ : व्यावसायिक वाढीसाठी महत्वाचे पत्रव्यवहार कराल. आपल्या व्यक्तिमत्वाचा जनसमुदायावर सामाजिक ठिकाणी चांगला प्रभाव पडेल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.
मिथुन : आज आपल्याकडूनवरिष्ठ जादा कामाची अपेक्षा करतील. महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील.
कर्क : व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढणार्या घटना घडतील. आपले काम पूर्ण व्हावे म्हणून व्यावसायिक मतभेद टाळावेत. आर्थिकउलाढालींबाबतचे निर्णय पुढे ढकलावेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल.
सिंह : आज आपणास सुवार्ता समजतील.वास्तूविषयी प्रश्नासंबंधी आज आपली कुटुंबियांशी चर्चा होईल. आपली मते डळमळीत ठेवू नका. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. प्रवास घडून येतील.
कन्या : संध्याकाळी मित्रपरिवाराबरोबर मेजवानीच्या बेतात सहभागी व्हावे लागेल.मित्रमैत्रिणींना आर्थिक सहाय्य कराल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील.
तूळ : आपल्या अपेक्षित गाठीभेटीतून व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने शुभ घटना घडतील. व्यावसायिक शुभारंभ होतील. अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढेल्याने धाडसी कामे कराल. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल.
वृश्चिक : आपली कामे लवकरच मार्गी लागतील. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल.
धनू : आर्थिक घडामोडींच्या दृष्टीनेआजचा दिवस अनुकूल नाही. संततीच्या प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
मकर : वाहने चालताना सावधगिरी बाळगा. आपले अंदाज आज अचूक ठरतील. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल.
कुंभ : भागिदारीत व्यवसाय करणारांना सावधगिरी बाळगावी लागेल.कोणताही महत्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तिचा सल्ला घ्यावा. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल.
मीन : आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.आपल्या भाग्योदयाच्या दृष्टीने अनुकूल घटना घडतील. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.