जळगाव प्रतिनिधी । शहरात जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना पोस्ट ऑफिस समोर सोमवारी ७ डिसेंबर दुपारी २ घडली. यात दुचाकीस्वार तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी जितेंद्र पवार (वय-३३) रा. नविन जोशी, सिंधी कॉलनी रोड या आपल्या मुलगा सचिन जितेंद्र पवार याला घेवून खासगी कामानिमित्त सोमवारी ७ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास (एमएच १९ डीडी ४०१८) ने गेले. शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस जवळ मागून भारधाव वेगाने येणारी (एमएच १९ सीई ०१९१) क्रमांकाची दुचाकीने जोरदार धडक दिली.
यावेळी या दुचाकीवर तीन जण बसले होते तसेच दुचाकी चालक योगेश शिवाजी दाभाडे (पुर्ण पत्ता महित नाही) हा दारूच्या नशेत होता. या अपघातात सचिन पवार हा तरूण जखमी झाला. जखमीस खासगी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मंगळवारी दुपारी दुचाकी चालक योगेश दाभाडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शेखर जोशी करीत आहे.