जळगाव – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर जीवनदान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिराचा आज शहरातील रेडक्रॉस रक्तपेढीमध्ये शुभारंभ करण्यात आला.
पहिल्याच दिवशी शिबिरामध्ये 50 रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. संपूर्ण सप्ताहात 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर पिशव्यांचे संकलन जळगाव शहर काँग्रेस कमिटी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी बोलतांना सांगितले
यावेळी शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, एन एस यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, ब्लाँक अध्यक्ष नदीम काझी, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, अमजद पठाण, जाकिर बागवान, दिपक सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, शोएब पटेल, कैलास महाजन, शफी बागवान, नारायण राजपुत, कैलास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.