जळगाव – सह सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-1520/ प्र.क्र.24 /लोदिकक्ष, दि. 23 नोव्हेंबर, 2020 च्या परिपत्रकान्वये कोविड-19 चा फैलावास प्रतिबंध करण्यासाठी व विभागीय लोकशाही दिनाचे आयोजनाबाबत निर्देश देण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवार लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याच्या दुसऱ्या सोमवार, दिनांक 14 डिसेंबर, 2020 या दिवशी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दिली आहे.