Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

IPL 2020: मुंबईचा दणदणीत विजय; डी कॉकचा कोलकाताला दणका

क्विंटन डी कॉकची नाबाद ७८ धावांची खेळी

by Divya Jalgaon Team
October 17, 2020
in क्रीडा, राष्ट्रीय
0
mumbai indian winners

अबुधाबी – सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक ७८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा जोडीने दमदार सुरूवात केली. डी कॉकने अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितने फटकेबाजीस सुरूवात केली होती, पण तो ३५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवही १० धावांवर बाद झाला. पण डी कॉक मात्र फटकेबाजी करत राहिला. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ११ चेंडूत २१ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

त्याआधी कोलकाताचा नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली पण त्याचा निर्णय फसला. सलामीवीर राहुल त्रिपाठी ७ धावांवर बाद झाला. नितीश राणाही ५ धावा करून बाद झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिलही चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही ४ धावांवर बाद झाला. राहुल चहरने २ चेंडूमध्ये २ बळी टिपत कोलकाताची अवस्था वाईट केली. पाठोपाठ आंद्रे रसलही अयशस्वी ठरला. पण कर्णधार इयॉन मॉर्गन-अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून संघाला १४८पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकत नाबाद ५३ धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने नाबाद ३९ धावा केल्या.

Share post
Tags: D CockIPL 2020IPL 2020 MI vs KKRMumbai IndiansSportWinnerअबुधाबी
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे रूग्ण १२८ आढळले

Next Post

आमिर खानचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

Next Post
Amir Khan Son news

आमिर खानचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group