बारामती (प्रतिनिधी) – देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद आंदोलनाला बारामती शहरातील भाजीपाला विक्रेत्यांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बारामती शहरातील गणेश भाजी मंडई बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन विक्रेत्यांनी तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.
या निवेदनावर चिऊशेठ जंजिरे, बबलू बागवान, गणेश कदम, ज्ञानेश्वर गवळी, कय्यूम बागवान, यासीन बागवान, बाळासाहेब झगडे, सीमा अहिवळे, अजहर शेख आणि जावेद बागवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून बारामतीत सर्व भाजीविक्रेते दिवसभर बंद पाळणार आहेत, अशी माहिती चिऊशेठ जंजिरे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद हा आमच्यासाठी देखील महत्त्वाचा असून आम्ही यास पाठिंबा देऊन भाजी मार्केट बंद ठेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.