मेष : आपल्याघरी मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवले जातील. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे.
वृषभ : महत्वाचीकागदपत्रे हाती लागल्यामुळे आपल्या कामांना वेग येईल. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात. घरात आनंददायक गोष्टी घडतील.
मिथुन : शैक्षणिक सहलीत सहभागी व्हाल. गृहसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास अनुकूल नसल्याने कौटुंबिक कलहझाल्यास दुर्लक्षित करावेत. आपले काम दुसर्यावर सोपवू नका.
कर्क : अचानक खर्च उद्भवेल. गुंतवणूकीचा विचार करत असाल तर फसवणूकीची शक्यता असल्याने आपला विचार पुढेढकलावा. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल.
सिंह : महत्वाची कामे पार पाडताना व्यत्यय जाणवेल. आपली तब्येत सांभाळा. मानसिक स्वास्थ बिघणारी घटना घडेल. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल.
कन्या : महत्वाची कामे टाळावीत. तब्येतीच्या तक्रारी राहीतल. अचानक मोठा खर्च करावा लागेल. धार्मिक – आध्यात्मिक प्रगती साधता येईल.
तूळ : मित्रपरिवाराकडून अपेक्षाभंग होतील. आपल्या हातून आज दानधर्म होईल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.
वृश्चिक : नोकरीत वरिष्ठ कामाची जास्त जबाबदारी आपल्यावर टाकतील. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.
धनु : नोकरीत बढतीचे योग संभवतात. कामामुळे प्रवासयोग घडतील आपल्या जोडीदाराला अनुकूल संधी चालून येतील.अध्यात्मिक उन्नतीसाठी आजचा दिवस चांगला आहे. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली hmoB©b.
मकर : आज आपल्याला अचानक धनप्राप्तीचा योग आहे. वारसाहक्काने धनप्राप्ती अथवा लॉटरीत यश संभवते. संततीच्याखोडकरपणामुळे मनस्ताप होणारी घटना घडेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
कुंभ : व्यावसायिक करार करताना सावधगिरी बाळगावी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात, आपण जर नमतेपणाचे धोरणं अवलंबले तर मतभेद टळण्यास मदत होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कामानिमित्त प्रवास घडतील.
मीन : नोकरांवर विसंबून राहू नका. आरोग्याच्या तक्रारी राहतील महत्वाची कामे टाळावीत. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.