जळगाव , प्रतिनिधी । मागील आठ दिवसापासून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव ग्रामीण व महानगरतर्फे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आकाशवाणी चौकात आला असता ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील , महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , अल्पसंख्यनक विभाग प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक, आमदार अनिल भाईदास पाटील , मध्यवर्ती जिल्हा बैंक अध्यक्ष रोहिणीताई खडसे (खेवलकर), माजी आमदार दिलीप वाघ , माजी आमदार मनीष जैन , संजय गरुड, कल्पना पाटील, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , युवा महानगर अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, राजेश पाटील , तिलोत्तमा पाटील, सोपान पाटील, अन्वर खाटीक, एस. महाजन, सलीम इनामदार, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, रहीम तडवी, कौसर काकर, अॅड. कुणाल पवार, अॅड. राजेश गोयर, लता मोरे, जयश्री पाटील, कमल पाटील, मनीषा चौहान, ममता तडवी, अरविंद मानकरी, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी , सुनील माळी, डॉ. अभिषेक ठाकूर, तुषार राणे, मोहन पाटील, गणेश निंबाळकर, अक्षय वंजारी, जिल्हयातून आलेले अनेक नेते, पदाधिकारी या शेतकरी आंदोलन समर्थनार्थ उपस्तीत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची पक्ष श्रेष्ठींनी भेट घेवुन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कायदा विरोधात आंदोलनला पाठिंबा जाहीर केला.