जळगाव – राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे चोपडा येथील अमर संस्था संचलित बालमोहन प्राथमिक विद्यालयाच्या उपक्रमशील उपशिक्षिका रोहिणी भास्करराव कापडणे-शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण डॉ.एन.एम.काबरा फाउंडेशनचे चेअरमन डॉ.महेंद्र काबरा व संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेत उत्तम अध्यापन, अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विज्ञान प्रदर्शने, स्नेहसंमेलने व केंद्रानिहाय शिक्षण परिषद यातील यशस्वी सहभाग आणि विद्यार्थी हितासाठीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन संस्थेने त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. पुरस्कार वितरणप्रसंगी चोपडा येथील प्रताप विद्यामंदिरातील उपशिक्षक पंकज शिंदे उपस्थित होते.
रोहीणी कापडणे मॅडम ह्या राज्य आदर्शसमाजरत्न पूरस्कृत , व खान्देशी मराठा पूनरविवाह साठी झटणारे श्री, भास्करराव नाना पाटील यांच्या कन्यारत्न आहेत