जळगाव- जिल्ह्यात अलीकडेच शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र या शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत असून याचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी समिती स्थापन करून यासोबत बैठक बोलावली आहे.
खरेदी केंद्रांवर शेतकर्यांच्या आधी व्यापार्यांचा कापूस खरेदी करण्यात येत असल्याबाबत आरोप होत आहे. यंदा देखील टोकन पद्धतीने कापूस खरेदी करीत असल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक सुरूच आहे. तर कापूस कपातीच्या नावा खाली देखील लुट सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी सीसीआय, पणन महासंघाचे प्रतिनिधी व जिल्हा उपनिबंधकांची बैठक बोलावली आहे. तसेच कापूस खरेदी प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर गैरव्यवहार, वादांचे निवारण करण्यासाठी तालुका उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.