मुंबई पोस्टात खाते असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक केले आहे. भारतीय टपाल विभागाने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अंतिम मुदत जाहीर केली. इंडिया पोस्ट ऑफिसनुसार 11 डिसेंबर 2020 पर्यंत पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. अन्यथा देखभाल शुल्क म्हणून आपल्या खात्यातून 100 रुपये वजा केले जाणार आहेत. आपण आपले पोस्टात खाते खाते बंद होण्यापासून वाचवू इच्छित असल्यास लवकरच आपल्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम जमा करा.
इंडिया पोस्ट ऑफिसनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. इंडिया पोस्टाने लिहिले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी लवकरच तुमच्या खात्यात किमान 500 रुपये जमा करावेत. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभाल फीच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार आपल्याकडे आर्थिक वर्षाच्या शेवटी बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक नसतील, तर खाते देखभाल शुल्क म्हणून 100 रुपये वजा केले जातील. जर बचत खात्यात जमा केलेली रक्कम शून्य झाली असल्यास ते खाते बंद केले जाईल.
Now maintaining minimum balance in Post Office Savings Account is mandatory.#MyPostIndiaPost pic.twitter.com/mPuiy3P0Lu
— India Post (@IndiaPostOffice) December 4, 2020
किती व्याज मिळते?
सध्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातील रकमेवर व्याजदर 4 टक्के आहे, जो बँकांपेक्षा जास्त आहे. दहाव्या आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या दरम्यान किमान शिल्लक रकमेच्या आधारे व्याज मोजले जाते. पोस्ट ऑफिस वेबसाइटनुसार महिन्याच्या दहाव्या आणि शेवटच्या दिवसाच्यादरम्यान जर शिल्लक रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्या महिन्यात कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
कोण खाते उघडू शकते?
पोस्ट ऑफिस बचत खाते एक ज्येष्ठ व्यक्तीद्वारे किंवा दोन ज्येष्ठी व्यक्तींनी संयुक्तपणे किंवा एखाद्या बालकाच्या वतीने किंवा पालकांच्या वतीने उघडता येते. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावेसुद्धा खाते उघडले जाऊ शकते. एका व्यक्तीद्वारे केवळ एक पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते.
अजून वाचा
राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेणार