मेष : परिचयातून कामे पूर्ण होतील. मातृसौख्य लाभेल. आपल्या तडफदार बोलण्याचा प्रभाव पडेल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.
वृषभ : वास्तुविषयक प्रश्नासंबंधी चर्चा होईल. शैक्षणिक पारितोषिके मिळतील. उधारी वसूल होईल. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.
मिथुन : आपली मते कुटुंबातील व्यक्तींना पटवून द्याल. शैक्षणिक संदर्भात अपेक्षित गाठीभेटी होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीमुळेआर्थिक प्राप्ती होईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता वाटेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
कर्क : आपले मनोबल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विशिष्ट लाभ होतील नोकरीत भाग्यवृद्धी करणारी घटना घडेल. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. संतांचा सहवास लाभेल.
सिंह : मानसिक अस्वास्थ जाणवेल. मित्र परिवारापैकी एखाद्यास आर्थिक सहाय्य करावे लागेल. नोकरीत महत्वाच्या कामाचीजबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्यांना चांगले लाभ होतील.
कन्या : आजचा दिवस आपली इच्छापूर्ती होण्यास अनुकूल आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. वडिलभावंडाचे सहकार्य लाभेल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल.
तूळ : वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. नोकरी व्यवसायात भाग्यवृद्धी करणार्या घटना घडतील. गुंतवणूकीसंबंधी चर्चा करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल करावा सुखावह वाटेल.धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
वृश्चिक : संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपले निर्णय योग्य ठरतील. प्रवासयोगाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्णय घेणे गरजेचे आहे.
धनू : वाहन चालवताना सावधानता बाळगा. जोडीदाराच्या व्यवसायात भाग्यवृद्धी घडेल. आर्थिक सहकार्य मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्तीवादाने तोंड द्याल. नव्या उमेदीने कामाला लागाल.
मकर : व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढविताना सावधगिरी बाळगावी. पत्नीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. चांगली बातमी समजेल. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घ्याल. गुंतवणूकीतून लाभ होतील.
कुंभ : अचानक धनलाभाची शक्यत आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल.
मीन : तीर्थक्षेत्रासभेट देण्यासाठी प्रवास घडेल. आपल्या नोकरीत आज भाग्यकारक घटना घडेल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.