जळगाव प्रतिनिधी । संत नरहरी सोनार जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याच्या मागणीचे निवेदन समाजबांधवांच्या वतीने अजिठा रेस्ट हाऊस येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैचारिक, जडणघडण अत्यंत मौल्यवान भुमिका बजावणाऱ्या संत, महात्मा, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी अशा राष्ट्रपुरूष यांची शासकीय स्तरावर जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याला उजाळा देत आहे.
शासनाने आतापर्यंत सर्वच समाजातील अनेक महापुरूषांचा शासकीय स्तरांवर जयंती, पुण्यातिथी साजरा करून गौरव केला आहे. सोनार समाजाचे आराध्य दैवत असलेले संत श्रेष्ठ श्री नरहरी सोनार यांच्या जयंतीच्या समावेश केला नसून आपल्या कार्यकाळात तरी २०२१-२२ पासून जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यास सुरूवात करावी अशी मागणी सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार संस्थेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर अध्यक्ष प्रदीप सोनार, उपाध्यक्ष प्रदीप वाघ, हरीष जगताप, हर्षल सोनार, प्रमोद विसपूते, कृष्णा जगताप, भावेश सोनार, सागर दुसाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.