जळगाव प्रतिनिधी । जळगावातील शाहुनगर भागात दोन जणांनी घरात घुसून नासधुस करून महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली. शहर पोलीस स्थानकात दोन जणांवर चोरी व मंगळसूत्र लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरा नगरात नसरिनबी शे वसीम (वय-२८) हे घरकाम करतात. या कामाच्या निमित्ताने १ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. रात्री ९ वाजता त्या घरी आल्यावर घरातील सामानाची नासधुस केल्याचे दिसून आले. दरम्यान, शाहुनगर भागातील परवीनबी शेख वसीम आणि शेख यासीन यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी डोक्यात लोखंडी झारेने मारून गंभीर दुखापत केली आणि गळ्यातील २० हजार ४०० रूपये किंमतीची मंगलपोत तोडून घेतली.
घरातील मोबाईल, टिव्ही आणि इतर गृहउपयोगी सामानाची नासधुस केली. याप्रकरणी नसरिनबी शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रवीनबी शेख वसीम आणि शेख यासीन यांच्या जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा हे करीत आहे.


