बोदवड प्रतिनिधी । बोदवड येथील तत्कालीन गटविकास अधिकारी रमेश ओंकार वाघ यांची चौकशी करण्यात आली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली होती.
रमेश ओंकार वाघ हे बोदवड येथे गटविकास अधिकारी असतांना त्यांच्या कार्यकाळात अनियमितता व भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांची चौकशी करावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या पथकाने गुरूवारी वाघ यांची चौकशी केली.
या पथकात धुळे जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी बी.एम. मोहन, धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोतकर, जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी पथकात होते. या चौकशीनंतर वाघ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.