जळगाव प्रतिनिधी । शास्त्री टॉवर चौकासह इतर भागात शहर वाहतूक आणि शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दुचाकी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ३३० बेशिस्तवाहन धारकांवर कारवाई करत वाहतूक पोलीसांनी ३४ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना १४ हजाराच्या उंबरठ्यावर असतांना शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ आहे. असे असतांना काही नागरिक व दुचाकीधारक मास्क न लावता फिरणे, ट्रिपल सिट घेवून फिरणे, बिनाकारण बाहेर फिरणे आणि लायसन्स सोबत न बाळगणे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशनानुसार शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यामानाने शहरातील शास्त्री टॉवर चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, फुले मार्केट, गोलाणी मार्केट चौक, कोर्ट चौक, चित्रा चौक या परिसरात ३३० बेशिस्तवाहनधारकांवर कारवाई करत ३३ हजार ३०० रूपयांचो दंड वसूल केला आहे. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय नाईक, पो.कॉ. मुरलीधर पाटील, भटू पाटील, रफिक शेख, संजय मराठे, दिपक भालेराव, मुबारक सैय्यद, नईम शेख, अलिम पठाण यांनी ही कारवाई केली आहे.