जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील पोलीस स्थानकाचे प्रभारी सपोनि प्रवीण साळुंखे यांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेतांना नशिराबाद पोलिस ठाण्याचा कर्मचारी सतीश रमेश पाटील (वय ४३, रा. सिद्धिविनायक कॉलनी, पिंप्राळा) याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली होती.
दरम्यान, यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी १० ऑक्टोबर रोजी सेवेतून निलंबित केले. याच्या पाठोपाठ नशिराबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.