जळगाव प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले. रावेर बऱ्हाणपूर रोडवरील चौधरी ऑटो पार्टच्या दुकानासमोरून अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले होत. सदरील ट्रॅक्टर लांबवित असतांना एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बऱ्हाणपूर रोडवरील चौधरी ॲटो पार्टच्या दुकानासमोरील रोडवर वाळूने भरलेले ट्रक्टर आणि ट्रॉलीसहीत पोलीसांनी जप्त केले होते. मंगळवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संशतिय आरोपी मनोज तुकाराम कोळी (वय-३०) रा. आटवाडे ता. रावेर हा कोणतीही परवानगी नसतांना घेवून जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले.
त्यांनी मनोज कोळी याला अटक केली. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उमेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात मनोज कोळी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ शेख इस्माईल करीत आहे.