जळगाव । धरणगाव तालुक्यातील निशाणे फाट्याजवळ अपघातात एक ठार व पाच जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. निशाणे फाट्याजवळ दोन मोटारसायकलींना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाले व पाच जण जखमी झाले.
निशाणे फाट्याजवळ आज दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला व पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर पळ काढला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रूग्णालयात जखमींना दाखल केले आहे. दरम्यान, यातील एका रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.