जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनिपेठतील सट्टा पेढीवर नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांच्या पोलिसांची धाड टाकली. यात रोख रकमेसह मोबाईल व सट्ट्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून सट्टापेढी चालविणार्यासह सात जणांवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास शहरातील शनिपेठ परिसरातील दत्तमंदिर मागील लाकडी टपरीमध्ये सट्टा जुगार खेळवित असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांना मिळाली. त्यांनी तात्काळ किरण धमके, मनोहर जाधव, सुनिल पाटील, विनयकुमार देसले, अनिल पाटील, विजय काळे, अशोक फुसे, रविंद्र मोतीराया यांचे पथक तयार केले.
या पथकाने शनिपेठेत सट्टापेढी सुरु असलेल्या टपरीवर धाड टाकली. याठिकाणी सट्टा पेढीचालक अशोक ओंकार ठाकूर रा. भिकमचंद जैन नगर हा काही जणांनाकडून सट्टा घेत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. यातील पोलिसांनी धाड टाकल्याचे बघताच सट्टा लावण्यासाठी आलेल्या काही जणांनी या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य यासह २४ हजार ५५० रुपये रोख व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी पोहेकॉ किरण धमके यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सट्टापेढीवर टाकलेल्या धाडीत सट्टापेढी चालक अशोक ओंकार ठाकूर रा. भिकमचंद जैन नगर, विनायक सुरेश वाणी रा. बालाजी पेठ, महेंद्र संतोष चौधरी रा. जोशी पेठ, भादू देवराम पाटील रा. देवगाव ता. चोपडा, रामदास निनाजी तायडे रा. महाबळ कॉलनी हे सट्टा घेणार्यांसह सट्ट्याचे आकडे लावणारा प्रकाश संतोष भोई रा. शिवाजीनगर हुडको यांना अटक करण्यात आली असून सिद्धार्थ (पुर्ण नाव माहिती नाही) हा पळून गेला.
अजून वाचा
पिंप्राळ्यातील हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी केले जेरबंद