मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जळगाव जिल्हा मध्यवर्तीसह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन नविन मुक्ताई मंदिरात करण्यात आले होते. याप्रसंगी रोहिणी खडसे यांची केळी व फळ तुला करण्यात आली. गरजूंना या फळांचे वाटप करण्यात आले.
रोहिणी खडसेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रोहिणी ताई यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. त्यांनतर रोहिणी खडसे यांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची केळी तुला करण्यात आली. सोहळ्याचे प्रास्ताविक ईश्वर रहाणे यांनी केले. प्रसंगी अध्यक्षस्थानी रवींद्र पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तराळ यांची उपस्थिती होती. यावेळी रोहिणी खडसे म्हणाले की, वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक जण नवीन संकल्प करत असतो यंदाच्या वाढदिवसाला येणारे संपूर्ण वर्षभरात पक्ष संघटन वाढविण्याचे संकल्प मी करत आहे.
माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तर नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाने पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. यासाठी प्रत्येकाने कार्य करायचे आहे. पक्षाचे विचार अधिक ताकदीने समाजापर्यंत पोहचविण्याकरिता सगळ्यांनी सज्ज व्हायचे आहे. पक्ष कार्यासाठी आपण नेहमीच तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी दिली. त्या पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील लवकरच वाढदिवस असून तेव्हा देखील सर्व ठीकाणी आपल्याला साजरा करून गरजूंना हवी ती मदत करायची असून सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच सगळ्यांनी भरभरून दिलेल्या प्रेमापोटी शुभेच्छांचे आभार मानले.
नाथाभाऊ आणि रोहिणीताई यांच्या पक्ष प्रवेशाने तालुका राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य आले असून सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पक्ष संघटन वाढवायचे आहे. यावेळी जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले की, पक्ष संघटना वाढविण्याससाठी प्रत्येकाने सहभाग नोंदविला हवा. तसेच अनेक राजकीय कोपरखळ्या मारत त्यांनी बीएचारच्या प्रकरणात सगळ्यांना आमचा संबंध वाटत असून त्या फाइलची चौकशी काढण्यात आमचा संबंध नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
त्याची चौकशी आदेश मागील सरकारमध्ये दिले गेले होते असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे , बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, उपाध्यक्ष पवनराजे पाटील, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, विलास धायडे, राजुभाऊ माळी, संदीप देशमुख, दशरथ कांडेलकर, सुधाकर चोपडे, किशोर चौधरी, विशाल महाराज खोले, अतुल चौधरी, विजय सोनार, विकास पाटील, शाहिद खान, लता सावकारे, कल्याण पाटील, रवींद्र दांडगे, भाऊराव महाराज पाटील, माणिक पाटील, गणेश तराळ, श्रीराम चौधरी, राजेश ढोले, मुन्ना बोडे, शिवराज पाटील, संजय कोळी, संजय माळी उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल महाराज खोले यांनी तर आभार तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील यांनी मारले. याचबरोबर मुक्ताईनगर येथे यशपाल जैन यांच्या हॉस्पिटलमध्ये रोहिणीताई खडसे मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० पिशवी रक्त संकलित करण्यात आले. तसेच शिरसाळा ता. बोदवड येथे रामभाऊ पाटील उचंदा यांचे तर्फे रोहिणीताई खडसे यांची लाडू तुला करण्यात आली.