जळगाव – बीएचआर प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी माहिती दिली की, सर्व मालमत्ता खरेदीचे व्यवहार आम्ही तपासणार आहोत. त्यानुसार जमिनी खरचं कवडीमोल भावात विकल्या गेल्या आहेत का?, यादृष्टीने सर्व व्यवहार तपासले जातील. तसेच यानिमित्ताने बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता खरेदीच्या गैरव्यवहाराशी संबंधित चौकशी आता महत्वपूर्ण मुद्याकडे वळणार असल्याचे दिसत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आम्ही अनेक कागदपत्र जप्त करुन सोबत आणली आहेत. प्रत्येक कागदपत्राची कसून तपासणी केली जात आहे. प्रत्येक मुद्दा तसेच प्रत्येक कागदाची आम्ही स्वतंत्र नोट तयार करत आहोत. हळूहळू त्या दृष्टीने तपास सुरू आहे. तसेच आज काही जणांची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी आम्ही लवकरच ‘बीएचआर’च्या सर्व मालमत्ता खरेदीचे व्यवहार आम्ही तपासणार आहोत. त्यानुसार जमिनी खरचं कवडीमोल भावात विकल्या गेल्या आहेत का?, यादृष्टीने सर्व व्यवहार तपासले जातील, असे सांगितले.