Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

देशातील सर्वात स्वस्त 5 जी फोन लाँच; जाणून घ्या

Moto G 5G ची किंमत आणि फिचर्स

by Divya Jalgaon Team
December 1, 2020
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय
0
देशातील सर्वात स्वस्त 5 जी फोन लाँच; जाणून घ्या

नवी दिल्ली – आधी अमेरिकेची आणि नंतर चीनच्या लिनोवोने ताब्यात घेतलेली जगातील बहुतांश पेंटंट नावावर असलेली कंपनी मोटरोलाने (Motorola) ५जी च्या बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला असून वनप्लसच्या नॉर्डला किंमत आणि फिचर्सच्या बाबतीत कडवी टक्कर देणार आहे.

Moto G 5G हा फोन ७ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे.

Moto G 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या लाँच करताच डिस्काऊंट देण्यात येत असून हा फोन चार हजार रुपयांनी स्वस्त विकला जाणार आहे. याचबरोबर एसबीआय किंवा अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरल्यास त्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच पहिल्याच सेलमध्ये 19,999 रुपयांना हा फोन मिळणार आहे. Moto G 5G हा फोन वॉल्कैनिक ग्रे आणि फ्रॉस्टेड सिल्वर रंगामध्ये उपलब्ध आहे.

मोटो जी 5जी अँड्रॉईड १० वर चालतो. यामध्ये 6.7 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी वाढविता येते.

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल वाइड-अँगल व तिसरा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटो जी 5G ला डस्ट प्रोटेक्शन IP52 देण्यात आले आहे. मागे फिंगरप्रिंट सेंन्सर आहे. 5000mAh ची बॅटरी जी 20 वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ही बॅटरी दोन दिवस येते असा दावा कंपनीचा आहे. या फोनचे वजन 212 ग्रॅम आहे.

अजून वाचा 

सर्वात ‘स्लिम’ 5G मोबाईल भारतात होतोय ‘लाॅंच’; जाणून घ्या ‘फिचर्स’

Share post
Tags: #Moto GDivya JalgaonIndiaInternational NewsMarathi NewsMobileNew DelhiNew Delhi latest newsNew Smartphone LounchTechnologyTechnology Newsदेशातील सर्वात स्वस्त 5 जी फोन लाँच; जाणून घ्याफोन लाँच
Previous Post

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा आराखडा बीसीसीआयकडून जाहीर

Next Post

आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर जारी, जाणून घ्या

Next Post
सर्वसामान्यांना फटका ! घरगुती गॅसच्या दरात ७५ रुपयांची दरवाढ

आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर जारी, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group