Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking! विषारी दारूने घेतला 14 जणांचा बळी; 10 जणांना अटक

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in गुन्हे वार्ता, राष्ट्रीय
0
poisionous_liquor crime

उज्जैन – कोरोनाचं संकट असतानाच देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. मध्‍यप्रदेशच्या उज्जैन (Ujjain) मध्ये एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. विषारी दारुमुळे (Poisonous Liquor) 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एक खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अवैध दारूविरोधात कारवाईत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमध्ये दोन व्यक्तींचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याचा तपास सुरू केला. त्यावेळी अन्य दोन व्यक्तींचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता. विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे. सर्व मृतांच्या शरीरात विषारी घटक सापडल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटीला चौकशीचे आदेश

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रकरणी एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त उज्जैन नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.

विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जण बेकायदेशीरपणे जिंजर (विषारी दारू) तयार करून विक्री करीत होते. मुख्यत: जिंजर तयार करणाऱ्यामध्ये सिंकदर, गबरू आणि युनूस यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने तब्बल 86 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

Share post
Tags: 10 Acused14 DeathcrimePeoplePoisonous LiquorPolicePolice CustodyUjjain
Previous Post

उत्तर प्रदेशात भाजपा कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या

Next Post

IPL 2020 : के के आर विरुद्ध मुंबईचे पारडे जड

Next Post
sport news

IPL 2020 : के के आर विरुद्ध मुंबईचे पारडे जड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group