Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चैतन्यनगर तांडा गावाने पटकावला प्रथम क्रमांक

दिनकर राठोड जलयोध्दा पुरस्काराने सन्मानित...

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in जळगाव
0
चैतन्यनगर तांडा गावाने पटकावला प्रथम क्रमांक

चाळीसगाव – तालुक्यात शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजलअभियानांतर्गत पाहिले खान्देश स्तरीय जल संमेलन २०२० येथील  राजपूत मंगल कार्यालयात नुकतेच  मोठ्या उत्साहात पार पडले.

यात शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानात सहभाग नोंदवत करगाव ग्रामपंचायत मधून अवघ्या ८ महिने पूर्वीच विभाजन झालेल्या चैतन्य तांडा-४ ग्रामपंचायत तालुक्यातून प्रथम बक्षीस १५०००० रुपये  मिळवण्याची मानकरी ठरली  गावात एकूण ५४६२४ घनमीटर इतके काम झाले असून यामुळे यंदा पहिल्याच पावसात ५ कोटी ४६ लाख २५ लिटर जलसाठा निर्माण झाला आहे कुठलाही राखीव निधी किंवा मोठ्या प्रमाणात कोणतेही उत्पन्न नव्हते शिवनेरी फाउंडेशन मार्गदर्शनाने गावात२०० ग्रामस्थांनी स्व खर्चातून  शोषखड्डे केले स्वतःची रोपवाटिका तयार करून १२०० वेगवेगळ्या व स्थानिक जातीची रोपे तयार करण्यात आली.

संपुर्ण जग कोरोना शी लढत असताना चैतन्यनगर तांडा या गावाने दुष्काळाशी दोन हात करण्याचे ठरवले गावातील सुज्ञ मंडळींनी एकत्र येऊन गावाच्या आजूबाजूला असलेल्या नाल्यांचे खोलीकरण करून पाण्याचा साठा करता येईल म्हणून भूजल अभियाना अंतर्गत काम केले  शिवनेरी फाउंडेशन च्या  माध्यमातून गाव पाणीदार झाले त्याची प्रचिती म्हणून आज बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात झाला याप्रसंगी गावाला प्रथम क्रमांक तर मिळालाच हे काम करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे दिनकर राठोड यांचाही जलयोध्दा म्हणून मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी आ. मंगेश चव्हाण, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, दिवाकर धोटे, उपसंचालक GSDA, अनुराधा पाटील भूजल तज्ञ जळगाव, उपेंद्र धोंडे, सहज जलबोधकार, अनिल भोकरे जिल्हा कृषी उपसंचालक जळगाव, एस. एन पाटील जीओलॉजि डिपार्टमेंट हेड जळगाव, लक्ष्मीकांत साताळकर उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, अमोल मोरे तहसीलदार चाळीसगाव, नंदकुमार वायकर गटविकास अधिकारी चाळीसगांव व तालुक्यातील सर्व जलयोध्ये उपस्थित होते.

पुरस्कार चे वितरण डॉ. बि एन पाटील मु. का. अधिकारी साहेब यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चैतन्य तांडा ४ च्या प्रथम महिला सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंदा शिवराम राठोड, सदस्य वसंत बाबू राठोड, अरुणा संदीप पवार, गीता साईनाथ राठोड, प्रवीण वसंत चव्हाण, अनिता भाऊलाल चव्हाण, यशोदा राजेंद्र चव्हाण करगाव विकास सोसायटी चे चेयरमन दिनकर धनसिंग राठोड, ग्रामसेवक पंकज धोंडू चव्हाण चैतन्य तांडा गावातील सर्व जलयोध्ये उपस्थित होते.

Share post
Tags: Chalisgaon NewsDinkar RathodDivya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsMarathi NewsShivneri Foundationचैतन्यनगर तांडा गावाने पटकावला प्रथम क्रमांक
Previous Post

मोठी घोषणा: आता रेल्वे स्थानकात कुल्हडमधूनच चहा मिळणार

Next Post

भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदारपदी निवड

Next Post
भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदारपदी निवड

भारतीय महिला धावपटू ललिता बाबर यांची तहसीलदारपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group