Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोठी घोषणा: आता रेल्वे स्थानकात कुल्हडमधूनच चहा मिळणार

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण घोषणा

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in राष्ट्रीय
0
मोठी घोषणा: आता रेल्वे स्थानकात कुल्हडमधूनच चहा मिळणार

जयपूर : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच चहा मिळणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. प्लास्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल, स्टेशनवर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद होणार असल्याचं ते म्हणाले.

राजस्थानच्या अलवरमध्ये ढिगावडा-बांदीकुई रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण उद्घाटन सोहळ्यात गोयल यांनी ही घोषणा केली. सध्या देशात जवळपास 400 रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधूनच चहा दिला जातो. येत्या काळात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधूनच चहाची विक्री केली जाईल, अशी योजना आहे. प्लास्टिक मुक्त भारतमध्ये रेल्वेचं हे योगदान असणार आहे. तसंच या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही गोयल म्हणाले.

आधीच्या काळात रेल्वे स्थानकांत कुल्हडमधूनच चहा दिला जात होता. ज्यावेळी 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आलं, तोपर्यंत कुल्हड गायब झाले होते आणि प्लास्टिक कपमध्ये चहा देण्यास सुरुवात झाली होती. खादी ग्रामोद्योग विभागातील लोकांनी रेल्वेसोबत मिळून या कार्याला गती दिली असल्याचंही गोयल यांनी सांगितलं.

कुल्हडमध्ये चहा पिण्याचा स्वाद वेगळाच असतो आणि पर्यावरणालाही आपण वाचवतो. पंतप्रधान मोदी 2014 पासून सत्तेत आले, तेव्हापासून ते लोकांच्या आरोग्याप्रती चिंतेत आहेत, असंही गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Share post
Tags: #JaypurDivya JalgaonJaypur latest newsKulhadsMarathi NewsPiyush GoyalPlastic CupsTeaमोठी घोषणा: आता रेल्वे स्थानकात कुल्हडमधूनच चहा मिळणार
Previous Post

‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६’ वर धावत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट

Next Post

चैतन्यनगर तांडा गावाने पटकावला प्रथम क्रमांक

Next Post
चैतन्यनगर तांडा गावाने पटकावला प्रथम क्रमांक

चैतन्यनगर तांडा गावाने पटकावला प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group