मध्य प्रदेश : ‘लव्ह जिहाद’ संदर्भातील कायदा लागू करण्यात आला आहे. राज्यपालांनी ‘बेकायदेशीर धर्मांतरण बंदी’शी निगडीत वटहुकूमाला आज शनिवारी मंजूरी दिली आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान अशी घोषणा केली होती की यूपीमध्ये लव्ह जिहादशी निगडीत कायदा केला जाईल. यूपी कॅबिनेटने 24 नोव्हेंबर रोजी ‘बेकायदेशीर धर्मांतरण बंदी विधेयका’ला मंजूरी दिली आहे.
सरकारचं म्हणणं आहे की या कायद्याद्वारे महिलांना सुरक्षित करण्याचा आमचा उद्देश आहे.
नुकतीच उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात आणलेल्या बेकायदा धर्मांतर विधेयक 2020 ला नुकतीच राज्यपालांनी मंजूरी दिली असून, या कायद्या अंतर्गत बरेली जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. एक मुस्लिम तरुण हिंदू मुलीला व तिच्या परिवाराला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार टिकाराम पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाली होती.
शरीफनगर गावातील रफिक अहमद यांचा मुलगा उवेस अहमदने एका हिंदु मुलीशी ओळख वाढवली. त्यानंतर तो धर्म बदलण्यासाठी त्या मुलीवर दबाव टाकत होता. याबाबत मुलीच्या वडीलांनी उवेस अहमद विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
The woman, a Hindu, has lodged a complaint, stating that the man, Irshad Khan, harassed her & his family members were pressurizing her to adapt to their culture & learn Urdu, Arabic languages: Bharat Dubey, SDPO, Dhanpur, Shahdol (29.11.2020) https://t.co/iwd8K1W4xe
— ANI (@ANI) November 30, 2020