Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विद्याने आमदारांना नकार दिल्याने त्यांच्या टीमला गेटवरच अडवले

by Divya Jalgaon Team
November 30, 2020
in मनोरंजन, राज्य
0
विद्याने आमदारांना नकार दिल्याने त्यांच्या टीमला गेटवरच अडवले

मुंबई – सध्या आपल्या शेरनी चित्रपटाच्या चित्रिकरणात निमित्त अभिनेत्री विद्या बालन मध्यप्रदेशच्या गोंदियात आहे. विद्यासह चित्रपटाची टीम चित्रिकरणासाठी तिथे बालाघाट टायगर फॉरेस्टमध्ये गेली होती. मध्यप्रदेशचे आमदार विजय शाह यांनी त्यावेळी विद्या बालनला रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केले. पण विद्याने आमदारांना नकार दिल्यानंतर घडलेला हा प्रकार समोर आला आहे. शेरनीचे तेथील परिसरातील चित्रिकरण संपल्यानंतर युनिट परतल्यानंतर हा घडला प्रकार समोर आला आहे. पण या घडल्या घटनेला संबंधित आमदार नकार देत आहेत.

मागील काही दिवसांपासून शेरनी या चित्रपटाच्या चित्रिकरणात विद्या बालन व्यस्त आहे. बालाघाटच्या व्याघ्र प्रकल्पात या चित्रपटातला काही भाग शूट होणार होता. चित्रपटाच्या टीमने त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या काढल्या. 30 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या दिवशी चित्रिकरण करण्याचे ठरले. विद्या त्यानुसार चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये आली. त्यानंतर 8 आणि 9 नोव्हेंबरला आमदार विजय शाह यांनी विद्याला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार 8 तारखेला सकाळी 11 ते 12 या वेळेत ही भेट ठरली. परंतु, विद्याला भेटण्यासाठी हे आमदार महोदय संध्याकाळी पाच वाजता आले. शाह यांनी तिथे भेट झाल्यावर विद्याला रात्री जेवणासाठी निमंत्रित केले.

पण त्याचवेळी महाराष्ट्रातील गोंदिया येथे विद्याला परतायचे असल्यामुळे तिने हे निमंत्रण स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाचे युनिट जेव्हा चित्रिकरणासाठी बालाघाटमध्ये गेले, तेव्हा गेटवरच त्यांना आडवण्यात आले. या चित्रपटाच्या टीमला सर्व परवानग्या असूनही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. ही बातमी त्यानंतर वाऱ्यासारखी पसरली. तेथील डीएपओच्या टीमने विद्याच्या युनिटला थांबवले होते. पण डीएफओने या टीमला बड्या अधिकाऱ्यांनी फोनाफोनी करून सूचना केल्यानंतर आत सोडण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना फोनफोनी करावी लागली.

विजय शाह यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, चित्रिकरण थांबवण्याचा विचार नव्हता. एरवी जंगलात दोन जनरेटर जातात. पण बरेच जनरेटर त्यादिवशी आणल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना थांबवण्यात आले. शिवाय, चित्रपटाच्याच टीमने मला जेवणासाठी विनंती केली, पण मला ते शक्य नसल्याने मी ती नाकारली.

Share post
Tags: #Vidya BalanBollywoodBollywood Marathi NewsBollywood newsDinnerDivya JalgaonMarathi NewsMLAMumbaiMumbai Latest Newsविद्याने आमदारांना नकार दिल्याने त्यांच्या टीमला गेटवरच अडवले
Previous Post

जिल्‍हा रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक

Next Post

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला भेट देणार

Next Post
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला भेट देणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला भेट देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group