जळगाव प्रतिनिधी । मटणाचे दुकान लावण्यावरून एकाने दुकानदारासह तिघांना शिवीगाळ करून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकावरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथील राहणाऱ्या हनीफ भीकन खाटीक हे गेल्या ५ वर्षांपासून मटन विकण्याचा व्यवसाय करतात. रोजच्यावेळी शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुकान लावलेले होते. त्याच गावातील हिरामण ईश्वर खलसे रा. शिरसोली प्र.न. याने दुकानदार हनीफ खाटीक यांच्यासह सत्तार खाटीक व इम्रान खाटीक या तिघांना दुकान लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
शिवीगाळ केल्यानंतर याला विरोधात केला असता हिरामण याने तिघांना मारहाण केली. तर मटन कापण्याच्या हत्याराने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात हनीफ खाटीक यांच्या फिर्यादीवरून हिरामण खलसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विशाल सोनवणे करीत आहे.