Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह तिघांना अटक

by Divya Jalgaon Team
November 28, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चोपडा शहरातून गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह तिघांना अटक

चोपडा – स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा शहर पोलीस स्टेशनने दोन बनावटी पिस्टल आणि सहा जिवंत काडतुस बाळगणाऱ्या तीन जणांवर कारवाई केली आहे.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार बकाले, आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनने पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण  यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे मध्यप्रदेश राज्यातुन काही  तरुण हे पार उमर्टी ता. वरला (मप्र) येथुन गावठी बनावटी शस्त्रे खरेदी करुन चोपडा शहरातुन जाणार आहे.

त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे ,अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे कडील कर्मचारी सफौ  राजेद्र पाटील,पोहेकॉ सुधाकर  आंबोरे, पोहेकॉ अश्रम निजामोद्दीन शेख,पोहेकॉ नरेंद्र वारुळे, पोना दिपक  पाटील,पोना मुरलीधर  बारी,पोकॉ दिपककुमार  शिंदे, पोना प्रमोद लाडवंजारी, पोकॉ किरण धनगर, पोकॉ,दर्शन तसेच चोपडा शहर पोस्टे नेमणुकीचे सहा  पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहा पोलीस निरीक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, पोना प्रदीप राजपुत, पोना संतोष पारधी, पोना ज्ञानेश्वर जवागे,पोकॉ हेमंत कोळी, पोहेकॉ सुनिल पाटील, पोना जयदिप राजपुत, पोकॉ प्रमोद पवार,पोकॉ रविद्र पाटील यांना दोन पथकात विभागणी करुन रवाना करण्यात आले.

मिळालेल्या माहिती प्रमाणे रवाना झालेले  अधिकारी, कर्मचारी यातील एका पथकाने चोपडा शहरात चुंचाळे ते चोपड़ा रोडावर सुदंरगढीच्या कोप-यावर सार्वजनीक शौचालयाजवळ आज दि.२८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास  आकाश माधव सानप (वय २४. रा.चिंचोल ता सिन्नन जि नाशिक), महेश निवृत्त सानप (वय २४. रा वडगांव पिगंळा ता सिन्नर जि नाशिक) यांच्याकडील २५०००/-  रुपये किमतीचे एक गावटी बनावटीचे पिस्टल (कट्टा) व ४०००/- रुपये किमतीचे ४ जिवंत काडतुस असा एकुण २९०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुस-या पथकाने आज दि. २८ रोजी पाच वाजेच्या सुमारास चोपड़ा ते चुंचाळे रोडवर स्माशनभुमीजवळ  मयुर काशिनाथ वाकडे (वय २२ रा अरुणनगर चोपडा) याच्याकडील  २५०००/- रुपये किमतीचा एक गावटी बनावटीचे पिस्टल (कट्ट) व २०००/- रुपये किमतीचे २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. या अटक केलेल्या गुन्हेगारांकडून याप्रकरणी अधिक माहिती घेण्यात येत आहे.

Share post
Tags: #Divya Jalgoan newsChopdacrimeJalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsMarathi Newsचोपडा शहरातून गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह तिघांना अटक
Previous Post

मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी करणार उपाय

Next Post

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ नोव्हेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ नोव्हेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group