एरंडोल – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायत गालापुर अंतर्गत असलेल्या आदिवासी वस्तीवरील जिल्हापरिषदेच्या शाळेत सर्व पालक माता भगिनी यांना मास्क तसेच सनीटायझर चे वाटप करण्यात आले.
त्याच जोडीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर आधारित जीवनात समतेचे महत्त्व या विषयावर शाळेचे मुख्याध्यापक तथा मराठा सेवा संघ प्रणित शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भी, ल सुभाष दादा भील सुनील आप्पा भील सिमाताई सोनवणे उषा पवार दुर्गा भील , अनिता पवार उपस्थित होते.
न्याय स्वातंत्र्य समता बंधुता विचारांचा जीवनात अंगीकार करण्याची शपथ यावेळी शाळेच्या वतीने कोरोणा चे सर्व नियम पाळून किशोर पाटील कुं झरकर यांनी उपस्थितांना दिली. आणि विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली विद्येचे महत्त्व विशद केले.आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर जाहीर व्हावा अशी भावना व्यक्त केली.