जळगाव – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यांनतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीं संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती दिली. त्या नंतर मुंबई हल्ल्यामध्ये शाहिद झालेल्या शूर वीरांना मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.