Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मालकाची फसवणूक व दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सरस्वती फोर्ड शोरुममधील कॅशिअर आणि महिला कर्मचार्‍याच्या विरूध्द गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
November 27, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी ।  नशिराबाद जवळील सरस्वती फोर्ड या कार शोरूममध्ये ग्राहकाचे पैसे जमा न करता अपहार करण्यासह मालकाची फसवणूक करून दमदाटी केल्या प्रकरणी कॅशिअर आणि महिला कर्मचार्‍याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरस्वती फोर्ड शोरुममधील दीपा बबन पाटील उर्फ दीपा विलास पाटील ही महिला इन्शुरन्स एक्सिकेटीव्ह म्हणून २ वर्षापासून व विवेक सूर्यवंशी हा कॅशियर पदावर दीड वर्षांपासून कामाला होते.

दीपा पाटील हिने शोरुमच्या ग्राहकाकडून २३ ऑक्टोबर रोजी विम्याचे ३१,६६१ रुपये घेऊन कॅशियर सूर्यवंशींकडे जमा केले नाही. तसेच सूर्यवंशी यांनी विम्याचे पैसे जमा न करून घेताच ग्राहकाची पॉलिसी काढून दिली. हा सर्व प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने याप्रकरणी एचआर मॅनेजर राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेच्या फिर्यादीवरूनही या आधी सरस्वती फोर्डचे मुकेश टेकवाणी व धवल मुकेश टेकवाणी यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

कंपनीचे व्यवस्थापक धवल टेकवानी यांनी आधीच संबंधीत महिला ब्लॅकमेलींग करत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर ती महिला व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaon crime newsJalgaon newsSarswati FordShowroomमालकाची फसवणूक व दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Previous Post

तालुक्यातील वाळू तस्करांच्या टोळीवर पोलीस पथकाची कारवाई

Next Post

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणार दरमहा ५ हजार रुपये

Next Post
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणार दरमहा ५ हजार रुपये

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणार दरमहा ५ हजार रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group